डॉ. दंदे फाऊंडेशन, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशन अॉफ विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने अजनी येथील जलसंपदा कार्यालयाच्या परिसरात निःशुल्क विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. डॉ. दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम हाती घेण्यात आला. तर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा कार्य करीत आहे. शंभर खाटांच्या या विलगीकरण केंद्रात रुग्णांना भोजन व औषधे देखील निःशुल्क देण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते डिजीटल व्यासपीठावर या केंद्राचे उद्घाटन झाले.
- कोरोनानंतरची आव्हाने
- मा. ना. नितीनजी गडकरी यांच्याकडून व्हेंटीलेटर