मायेचा हात!
कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी कोरोनाग्रस्त गर्भवतींच्या प्रसूतीसाठी असमर्थता व्यक्त केली तेव्हा डॉ. दंदे हॉस्पिटलने पुढाकार घेतला. संचालकद्वय डॉ. पिनाक दंदे व डॉ सीमा दंदे यांनी कोरोनाग्रस्त गर्भवतींच्या वेदना ओळखल्या. कोव्हीड सेंटर असलेल्या डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त गर्भवतींची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर गेल्या वर्षभरात जवळपास चाळीस कोरोनाग्रस्त गर्भवतींना दंदे हॉस्पिटलने आधार दिला.